पारनेर : पारनेर तालुका दुष्काळ निवारण समितीच्या अध्यक्षपदी निघोज येथील लोकनेते नीलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब दगडू लंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आमदार नीलेश लंके यांनी यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मुश्रीफ यांच्या शिफारशीनुसार लंके यांना तालुका दुष्काळ निवारण समितीचे महत्वपूर्ण अध्यक्षपद मिळाले आहे.
गेली पंधरा दिवसात आमदार लंके यांनी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष, पारनेर तालुका वीज समिती सदस्य, व तालुका दुष्काळ निवारण समिती अध्यक्ष हे महत्वाचे तीन पदे निघोज येथील युवानेत्यांना दिल्याने निघोज व परिसरातील ग्रामस्थांनी आमदार लंके यांचे धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले आहेत.
ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब लंके हे गेली पंधरा वर्षांपासून सामाजिक जिवनात कार्यरत असून आमदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक म्हणून ते वीस वर्षांपासून तालुक्यात परिचीत आहेत.
आमदार लंके यांनी छोट्या बंधूसमान त्यांच्यावर प्रेम केले आहे. लोकनेते नीलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना लंके यांनी गेली दहा वर्षात निघोज व परिसरातील विकासकामे आमदार लंके यांच्या माध्यमातून मार्गी लावली असल्याने एक कार्यक्षम कार्यकर्ता म्हणून त्यांची तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे.
लंके यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत व कौतुक होत आहे. दुष्काळ निवारण समीतीमध्ये अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब लंके, सदस्य गटविकास अधिकारी पंचायत समिती किशोर माने, सचिव तहसीलदार ज्योती देवरे, सदस्य नायब तहसीलदार अविनाश देवरे, सदस्य मंडलाधिकारी सचिन पोटे, सदस्य तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड, अशासकीय सदस्य प्रगतीशील शेतकरी रमेश निवृत्ती रोहकले (भाळवणी) अशासकीय सदस्य, अल्पभूधारक शेतकरी श्रीमती पूनम नानासाहेब मुंगसे (रा. कडूस) अशाप्रकारे समिती गठीत झाली आहे.
दुष्काळ निवारण समितीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब लंके हे बोलताना म्हणाले की आमदार नीलेश लंके यांनी समीतीच्या माध्यमातून माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांला मोठी संधी दिली आहे. मतदारसंघ विकसीत होण्यासाठी आमदार लंके हे रात्रंदिवस प्रयत्नशील आहेत.
कोरोना महाभयंकर आजार असूनही लाखो जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून मतदारसंघाचा विकास त्यांनी केला आहे.
माझ्यावर जी जबाबदारी आमदार लंके यांनी दिली असून ती पार करण्याचे काम आपण व आपले सहकारी करणार असल्याची ग्वाही लंके यांनी दिली आहे.
Post a Comment