रोटरी इंटरनँशनलचे उपक्रम कौतुकास्पद...


कर्जत :  रोटरी इंटरनॅशनल ही संपूर्ण जगभर समाजोपयोगी कार्य करणारी जागतिक नामांकित सेवाभावी संघटना आहे. कर्जत शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश असलेल्या रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळ्या उपक्रमाचे माध्यमातून केलेले कार्य हे निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या अध्यक्षपदी इंजिनियर रामदास काळदाते तर सचिवपदी राजेंद्र जगताप यांनी निवड करण्यात आली. ही निवड २०२१-२२ वर्षासाठी करण्यात आली.


शहरातील रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी यांचे वतीने रोटरी वर्ष२०२१-२२ साठीनिवड झालेल्या नवीन पदाधिकारी सत्कार व नवीन रोटरी सदस्य यांचे  स्वागत कार्यक्रमाचे निमित्ताने आयोजित स्नेह मेळाव्यात ते बोलत होते.

आगळे म्हणाले की, गेल्या वर्षभरात कोविड परिस्थितीस सामोरे जात असताना रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीने प्रशासनास  वेळोवेळी बहुमोल सहकार्य केले आहे. गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी स्वच्छता अभियानमधील रोटरी क्लबचे कामाचा गौरव केला.

शहरातील सामाजिक सलोखा व शांतता प्रस्थापित करणेस व त्याद्वारे सामाजिक स्वास्थ्य अबाधित  राखणेस क्लब महत्वाची भूमिका बजावत असले बाबत आवर्जून उल्लेख केला.

यावेळी मावळते अध्यक्ष विशाल म्हेत्रे यांनी वर्षभरात रोटरी क्लब मार्फत राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

सन २०२१-२२ या रोटरी वर्षासाठी नवीन पदाधिकारी सत्कार करण्यात आला.

रोटरी क्लब अध्यक्षपदी  रामदास काळदाते यांची तर सेक्रेटरीपदी राजेंद्र जगताप यांची निवड घोषित करण्यात आली.

लवकरच पदग्रहण समारंभ प्रांतपाल यांचे उपस्थित होणार असले बाबत  क्लब संस्थापक डॉ. संदीप काळदाते यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश जेवरे यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post