श्रीगोंदा : आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै वसंतराव नाईक यांची जयंती निमित्त कृषि दिनाचे आयोजन पंचायत समिती सभागृह श्रीगोंदा येथे करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमास आमदार बबनराव पाचपुते, गितांजली पाडळे, प्रतिभाताई झिटे, सिध्देश्वर देशमुख, संदिप नागवडे, प्रशांत काळे, पद्मनाभ म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्मनाभ म्हस्के यांनी केले. कार्यक्रमात कै वसंतराव नाईक यांचे कार्यकर्तृत्वाबाबत माहिती मंडळ कृषि अधिकारी ज्ञानेश्वर सातपुते यांनी दिली.
कार्यक्रमात पिक स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या शेतक-यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सौ संगिता मारुती डाके यांनी बचत गटाच्या माध्यमातुन प्रकिया उद्योग या विषयी मार्गदर्शन केले. तसेच प्रगतशील शेतकरी राजेंद्र घेगडे व अभिजीत दळवी यांनी शेतीतील अनुभव व्यक्त केले.
कार्यक्रमात आमदार बबनराव पाचपुते,संदिप नागवडे,सिध्देश्वर देशमुख यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री संदिप बोदगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॅा राम जगताप यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आबासाहेब भोरे, अमजद तांबोळी, बाळासाहेब रासकर किसन सांगळे, प्रतिक कांबळे, संतोष झेंडे, आत्माचे नंदकुमार घोडके, अनिल औटी यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment