कर्जत : राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्ठाणने कोरोनाच्या काळात समाजोपयोगी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी केले.
राज्याचे जलसंपदामंत्री शंकरराव गडाख यांनी कर्जत येथील राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते महेश तनपुरे यांच्या यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, नगरसेवक सचिन घुले यांच्या हस्ते ना. शंकरराव गडाख यांचा सत्कार करण्यात आला.
महेश तनपुरे यांनी मंत्री शंकरराव गडाख यांच्या संकल्पनेतून कोरोनाच्या काळात सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकारांना,नगरपंचायतचे सफाई कामगार आदी कोरोना योध्दांना पौष्टिक आहार आणि मास्क सॅनिटायझरचे वाटप केले होते. तसेच गरिब व गरजू लोकांना महेश तनपुरे यांच्या वतीने किराणा साहित्यासह धान्य वाटप करण्यात आले होते.
कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरसह कर्जत येथील सर्व शासकीय कार्यालये, सर्व बँका व पतसंस्था, तसेच पत्रकार बंधूना २४ तास ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या आरेका पाम या सावलीत वाढणाऱ्या झाडांचे वितरण करण्यात आले होते.
सामाजिक संघटनेला वृक्षारोपण करण्यासाठी रोपांचे वाटप करण्यात आले होते असे अनेक समाजोपयोगी कार्य राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश तनपुरे यांनी केले असून या केलेल्या कार्याची माहिती यावेळी तनपुरे यांनी मंत्री गडाख यांना माहिती दिली. यावेळी गडाख यांनी महेश तनपुरे यांचे कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल कौतुक केले.
यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, नगरसेवक सचिन घुले, निलेश तनपुरे, गणेश वाळुंजकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल भगत, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष राजू बागवान, पीयूष सरोदे, रामभाऊ जहागीरदार, दुध संघाचे संचालक विलास धांडे, तसेच प्रविण घुले मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment