दौंड : रोटरी क्लब ऑफ दौंडतर्फे रोटरी डिस्ट्रिक्ट 3131च्या ग्रीन अर्थ ड्राईव्ह या उपक्रमाअंतर्गत गिरीम (ता. दौंड) येथील शैलेज जाधव फार्म हाऊस येथे 125 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
अध्यक्ष रोट शालिनी पवार म्हणाले की, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल ( DG) रोट.पंकज शहा यांचे संकल्पनेतून साकार होत असलेल्या प्रोजेक्ट ग्रीन अर्थ या उपक्रमांतर्गत दौंड तालुका व शहर परिसरात वृक्षलागवड करण्यात येणार आहे.
या वृक्षारोपण कार्यक्रमास रोटरी क्लब दौंड च्या अध्यक्षा रोट शालिनी पवार, सचिव रोट पायल भंडारी, डिस्ट्रिक्ट पर्यावरण डायरेक्टर रोट हरिभाऊ ठोंबरे, क्लबचे पर्यावरण डायरेक्टर रोट सुनिल ढगे, मेडीकल प्रोजेक्ट डायरेक्टर रोट. डॉ. फिलोमन पवार, ट्रेझरर रोट अस्लम शेख, रोट्रक्ट डिस्ट्रिक्ट मेंबर (Tree plantation) हर्षदा ठोंबरे, शैलेज जाधव, भाग्यश्री ठोंबरे, सानिया ढगे, रुचीर ढगे उपस्थित होते.
Post a Comment