श्रीगोंदा : सध्या पावसाने चांगली हजेरी लावली असल्यामुळे पिके जोमात आहेत. मात्र लष्करी आळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात मकाचे पीक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पण याच पिकावर लष्करी आळीच्या प्रादुर्भावामुळे पिके अडचणीत आली आहेत. यावरील किटकनाशकांचा होणारा खर्च मोठा असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
शेतकरी आर्थिक दृष्ट्या अडचणी-शिंदे(मका उत्पादक शेतकरी) कोरोनामुळे बाजारपेठ बंद होत्या त्या काळात उत्पादन केलेल्या मालाला भाव मिळाला नाही. त्यात भर म्हणून मकावर लष्करी अळी आल्यामुळे व त्यावरील कीटकनाशकांचा होणारा खर्च मोठा आहे.
आर्थिक अडचणीत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे कॄषी विभागाने शेतकऱ्यांना औषधे उपलब्ध करुन द्यावीत अशी मागणी मका उत्पादक शेतकरी बापु शिंदे यांनी केली आहे.
Post a Comment