पाथर्डी : गेल्या दोन वर्षांपासून कोव्हिड सारख्या साथरोगाने धुमाकूळ घालत असताना ही शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खंबीरपणे परिस्थिती हाताळली याच कौतुक देशभरात झाले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिवसैनिक विष्णुपंत पवार यांनी केले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार पाथर्डी तालुक्यातील शिवसंर्पक अभियानांचा शुभारंभ शंकरबाबा मठाचे मठाधिपती महंत परम पूज्य माधव बाबा यांच्या हस्ते शहराचे ग्रामदैवत रामगिरी बाबा यांच्या मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्या प्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक तथा पंचायत समितीचे माजी सदस्य विष्णुपंत पवार बोलत होते.
यावेळी शिक्षक सेनेचे तालुकाप्रमुख नंदकुमार डाळींबकर, शिवसेनेचे शहर संघटक संतोष मेघुंडे, एसटी कामगार सेनेचे तालुकाप्रमुख अलीम पठाण, सरचिटणीस शिवनाथ आंधळे, शहर उपप्रमुख विकास दिनकर उपस्थित होते.
सत्ता येते आणि जाते पण सत्ता हे सेनेचे अंतिम ध्येय नसून सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे. गोरगरीब जनतेसाठी लोकोपयोगी कामे करणे आवश्यक आहे. हीच बाळासाहेबांची शिकवण आहे.
पक्षप्रमुखांनी दिलेल्या आदेशानुसार तालुक्यात रक्तदान शिबिर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, दंत चिकित्सा शिबिर, वृक्ष लागवड संगोपन आणि जेष्ठ शिवसैनिक प्रती कृतज्ञता, कोव्हिड योध्दा आशाताईंचा गौरव आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले अशी माहिती पवार यांनी दिली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कार्य दिशादर्शक असून जनतेचे आशिर्वाद शिवसेने बरोबरच राहिलं असा आशिर्वाद महंत माधव बाबा यांनी दिला.
कार्यक्रमाला पप्पू बनसोड, बजरंग सोळसे, प्रथमेश नाकील,मुकुंद आंधळे, आजीनाथ चन्ने, पवन छजलानी,अमोल मुने, संतोष कुलट, प्रविण आव्हाड, बजरंग सोळसे आदी उपस्थित होते.
युवा सेनेचे सचिन नागापुरे यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. सेनेचे माजी शहर उपप्रमुख सुनील परदेशी यांनी आभार मानले.
Post a Comment