निघोज ग्रामपंचायत, ग्रामस्थ व संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन यांच्या वतीने ॲड. राहुल झावरे यांची पारनेर तालुका आत्मा कमिटीच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल तसेच वीज सल्लागार समितीच्या तालुका अध्यक्षपदी चंद्रभान ठुबे, सदस्यपदी सोमनाथ वरखडे, पारनेर तालुका दुष्काळ निवारण समितीच्या अध्यक्षपदी लोकनेते नीलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष निघोज येथील युवानेते ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब लंके पाटील यांच्या नियुक्ती बद्दल संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माउली वरखडे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष इधाटे व युवानेते राहुल वराळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राज्याचे माहिती व प्रसारण खात्याचे अध्यक्ष जितेश सरडे, देवीभोयरे गावचे सरपंच विठ्ठलराव सरडे, तुषार सोनावळे, रुपेश ढवण, मुस्लिम समाजाचे नेते बशिर तांबोळी, ग्रामसेवक दत्तात्रय वाळके, रमिज शेख, अविनाश वराळ, साजिद तांबोळी, प्रविण लंके, प्रफुल्ल लंके, मनोहर खोसे, सुखदेव ढवळे आदी यावेळी उपस्थित होते.
ॲड झावरे म्हणाले की, आमदार लंके यांनी राजकारण न करता समाजकारण माध्यमातून मतदारसंघाचा विकास केला आहे. कोव्हिड रुण्गांची सेवा कशाप्रकारे केली.याचा जगात नावलौकिक झाला.
निघोज ग्रामपंचायत माध्यमातून होणाऱ्या विकासकामाना पाठबळ देण्याची जबाबदारी आमची आहे. सचिन पाटील व त्यांचे सहकारी चांगल्या पद्धतीने विकासकामे करीत असून कधीही कोणतेही काम घेऊन या, विकासकामे होणारच अशी ग्वाही यावेळी ॲड. झावरे यांनी दिली.
संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी ॲड. झावरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. आमदार लंके यांच्या माध्यमातून मोठी विकासकामे सुरू असून जनतेसाठी रात्रंदिवस काम करणारे आमदार म्हणून लंके यांचा नावलौकिक असल्याचे गौरवोद्गार यावेळी वराळ यांनी व्यक्त केले.
Post a Comment