नेवासा : नेवासा तालुक्यातील तरूणांनी सुरू कलेले कार्य म्हणजे अभिनव उपक्रम आहे. ध्येय निश्चित असेल व प्रामाणिकपणा असेल तर कोणत्याही माध्यमातून केलेल कार्य ही देश सेवा व राष्ट्रीय हित जोपासते, असे प्रतिपादन महंत भास्करगिरी महाराज यांनी केले.
कृषी दिनाचे औचित्या साधून नेवासा तालुका अँग्रो प्रोड्युसर कंपनीचा लोकार्पण सोहळा महंत भास्करगिरी महाराज व कंपनाचे संचालक किशोर निर्मळ, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, सचिन देसरडा, फोरकास्ट ॲग्रो पुण्याचे डॉ. संतोष सहाणे, अजित मुरकुटे संतोष गव्हाणे आदी होते.
शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञान सहज व सोप्या भाषेत उपलब्ध व्हावे, शेतीमधील योग्य व्यवस्थापन करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे खत औषध, बियाणे कमी खर्चात उपलब्ध करून जास्तीत उत्पन्न तयार करून दर्जेदार पिकांची निर्मिती करून भाजीपाला, फळबागा, कडधान्य यांना चांगले बाजार मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी परदेशात शिकलेल्या व सामाजिक क्षेत्रात काम करणा-या तरूणांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
हा उपक्रम शेतीसाठी पुरक असुन प्रोत्साहन देणारा आहे. यामुळे चांगली फळभाजी निर्मिती व तरुणांना रोजगार उपलब्ध होणार, अशी माहिती डॉ. भारत करडक दिली. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्यांनी या कंपनीत सभासद नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे.
यावेळी सुनिल वाघ, संतोष काळे, ज्ञानेश्वर काळे सचिन चोरडिया गोरक्षनाथ तनपुरे यांना सभासदत्व देउन प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, रवींद्र नवले, योगेश म्हस्के, दत्तात्रय बडे, भाऊसाहेब कांगुने, भगवानराव राऊत, अँड वसंतराव नवले, महेश फलके, सरपंच सतीश निपुंगे, भारत भवार, संजूबाबा गायकवाड, संतोष प्रशांत भराट, सचिन नागपुरे, अँड रविंद्र गव्हाणे, सचिन गव्हाणे, सुनिल मोरे, संदिप कोलते, महेश नवले, श्रीनिवास रक्ताटे, अमृता सयाजी शेटे आदी उपस्थित होते.
Post a Comment