अमर छत्तीसे
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे बेलवंडी -शिरूर रस्त्यालगत कुकडी कॉलनी बस थांब्याजवळ पिंपळनेर (ता. पारनेर) येथील पांडुरंग जयवंत पवार (वय ५२ ) यांचा मृतदेह आढळून आला आहे.
पवार यांच्या डोक्याच्या जखमेवरून गोळीबार करुन पांडुरंग पवार यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पांडुरंग पवार यांचा गोळी झाडून हत्या झालेल्यांची नावे आहेत. हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह शनिवारी रात्री देवदैठण गावाजवळ तेथे टाकला असावा पोलिसांनी संशय व्यक्त केला . मृतदेहाची ओळख मयताचा मुलगा सागर पवार यांना पटली आहे.
सकाळच्या वेळी नागरिकांनी मृतदेह पाहिला. त्यानंतर त्यांनी बेलवंडी पोलिसांना संपर्क केला. पवार यांच्या कपाळावरून पाठीमागे आरपार जाणारी मोठी जखम आढळून आली.
हा गोळीबार करून खून केल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र ही हत्या कोणी कशासाठी कशाने कधी कुठे केली असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल , कर्जतचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव , बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे , उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, घटना स्थळी दाखल होऊन तपासाची सूत्रे फिरवली.
पिंपळनेर येथील तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. या घटनेमुळे श्रीगोंदा व पारनेर तालुक्यात मात्र खळबळ उडाली आहे.
ही हत्या नेमक्या कोणत्या कारणावरून झाली असावी, असा अंदाज पोलिस व नागरिक बांधत असून या प्रकरणाचा तपास करून आरोपींना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Post a Comment