पारनेर ः पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव आज (रविवारी) झाले. यामध्ये एक नंबर कांद्याला मागील लिलावाच्या तुलनेत क्विंटलमागे 400 रुपयांची वाढ झाली.
पारनेर बाजार समितीत दहा हजार 855 कांदा गाेण्यांची आवक झाली हाेती. यामध्ये कांद्याला 2500 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मात्र हा भाव एकाच कांद्याच्या वक्कल मिळाला. मात्र एक नंबर कांद्याला सर्वाधिक 2400 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल चा मिळाला.
कांद्याचे प्रतवारीनुसार भाव : एक नंबर कांद्याला 2000 त 2400, दाेन नंबर कांद्याला 1700 ते 2100, तीन नंबर कांद्याला एक हजार ते 1600, चार नंबर कांद्याला 300 ते 900चा प्रतिक्विंटल भाव मिळाला.
शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.
Post a Comment