ग्रामिण रूग्णालयातील आरोग्य सुविधांसाठी सव्वा कोटी चा निधी मंजूर....आमदार नीलेश लंके यांची माहिती


पारनेर : पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयात विविध आरोग्य सुविधांसाठी १ कोटी २५ लाख चार हजार रूपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली.  

रूग्णवाहिकेसाठी १६ लाख ८६ हजार २८० ऑक्सिजन प्लॅन्टच्या जनरेटरसाठी २५ लाख, ऑक्सिजन पाईपलाईन टाकण्यासाठी ११ लाख ६८ हजार तर ऑक्सिजन प्लॅन्टसाठी ४९ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार नीलेश लंके यांनी ग्रामीण रूग्णालयातील सुविधांसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला होता. पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये अनेक रूग्णांची आरोग्य सुविधांअभावी हेळासांड झाली होती. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर शंभर बेडचे रूग्णालय, ऑक्सिजन प्लॅन्ट, रूग्णवाहिकेसाठी निधी मंजूर झाला आहे. प्रत्यक्ष कामासही सुरूवात झाली आहे. 

तालुक्यातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी आ. लंके यांनी पुढाकार घेतला आहे. लवकरच आणखी सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

अलीकडेच तालुक्यात २०० बेडचे सेवाभावी सूसज्ज हॉस्पिटल उभारण्याची घोषणा आमदार नीलेश लंके यांनी केली आहे. तेथे रुग्णांची नोंदणी केल्यानंतर सर्व उपचार मोफत देण्याचे आमदार नीलेश लंके यांचे नियोजन आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post