सावकाराच्या घराची झाडाझडती... कोर्या धनादेशासह काही कागदपत्रे जप्त...


जामखेड :  येथील एका विनापरवानगी सावकारी करणार्या सावकाराच्या घरावर सहकारी विभागाच्या पथकाने छापा टाकून कागदपत्रांची तपासणी केली. त्यातील आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करून जामखेडचे सहाय्यक निबंधक कार्यालयात जमा करण्यात आले आहे.  

जामखेड येथील अन्सार युसूफ पठाण (रा. सदाफुले वस्ती, जामखेड) याच्या विरोधात सावकरीत करीत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे करण्यात आली. 

त्या तक्रारीनुसार जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी महाराष्ट्र सावकरी अधिनियम २०१४चे कलम १६ अन्वये कार्यवाही करण्याकरिता जामखेडचे सहाय्यक निबंधकांना सूचित केले. 

त्यानुसार सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर यांनी कलम १६ अन्वये कारवाई करण्याकरिता त्या सावकराच्या घराची झडती घेण्यासाठी पथक नेमले. 

साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला.  ही कारवाई जिल्हा उपनिबंधक यांच्या मार्गदर्शनानुसार  देवीदास घोडेचोर यांच्या मागर्दर्शनाखाली काल (गुरुवारी) अन्यार युसूफ पठाण यांच्या घराची झडती घेण्यात आली.  

यामध्ये घरामध्ये कोरे धनादेश, कोरे बॉंड, विसार पावती, असे अनेक संशयास्पद कागदपत्रे आढळून आली. ही सर्व कागदपत्रे पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आलेली असून जामखेडचे सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे.

 या कागदपत्रांची शहानिशा करून अवैध सावकाराविरुध्द महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ नुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post