पाथर्डी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाशी लढणे व विकास कामाचा डोलारा सांभाळणे अशी दुहेरी कसरत करीत आहेत. त्यांना आधार देण्यासाठी शिवसेनेची पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी शिवसैनिकांवर आहे. जुना
-नवा असा भेद करु नका. शिवसैनिक व बुथप्रुमख संघटनेचा आत्मा आहे. येणार्या निवडणुकीची तयारी करा, असे आवाहन राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी केले.
शहरातील गोरे मंगल कार्यालयात शेवगाव-पाथर्डी मतदार संघाच्या शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख डॉ. विजय पाटील, जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हा प्रमुख रामदास गोल्हार, सुनिल पालवे, महिला जिल्हा संघटक मंगल म्हस्के, प्रवीण अनभुले, शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे संघटक भगवान दराडे, पाथर्डी तालुका प्रमुख अंकुश चितळे, शेवगाव तालुका प्रमुख अविनाश मगरे, माजी पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पवार, महिला जिल्हा संघटक मंगल म्हस्के, प्रवीण अनभुले, सविता ससे, ज्येष्ठ नेते एकनाथ कुसळकर, नवनाथ चव्हाण, मीरा बडे, राजेंद्र म्हस्के, सागर राठोड, भारत लोहकरे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख सचिन नागापुरे आदी उपस्थित होते.
मंत्री गडाख म्हणाले, पाथर्डी-शेवगाव तालुका हा कायम दुष्काळी परीसर आहे त्यामुळे येथील सत्तर जुन्या तलावाच्या दुरुस्ती व खोलीकरणासाठी सोळा कोटी रुपये व चौदा नवीन बंधा-यासाठी दहा कोटी रुपये असा सव्वीस कोटी रुपयाचा निधी जलसंधारण खात्याकडून देण्यात येत आहे.
हीच विकासाची कामे घेऊन जनतेच्या दारात जा. कोरोनाच्या वाईट परस्थीतीत जनतेचा आधार बना, जनता तुम्हाला स्वीकारील. तुम्ही कामाला लागा. राज्यावर कोरोनाचे संकट असताना कर्जमाफी करुन व आरोग्याच्या सुविधा वाढवून मुख्यमंत्री उ्दधव ठाकरे यांनी चांगेल काम केले आहे.
शिवसैनिकाचे कामही अजोड आहे. शिवसैनिकामध्ये कडवेपणा असायलाच पाहीजे.घराघारत व गावागावात जाऊन
जनतेला दिलासा द्या. राज्यावर कीतीही कर्ज होवु द्या जनतेला संकटात वा-यावर सोडणार नाहीत. सध्या महाराष्ट्र राज्य कोरोनाचे सकंट व विकासाचा गाडा या दुहेरी संकटात आहे.
निवडणुकीला सामोरे जाताना तुम्ही जनतेत रहा जनता तुमच्या सोबत राहील. शिवसेनेचे तालुका प्रमुख अंकुश चितळे यांनी प्रास्ताविक सुखदेव मर्दाने यांनी सूत्रसंचालन तर अविनाश मगरे यांनी आभार मानले.
पंचायत समितीमध्ये विष्णुपंत पवार हे एकमेव शिवसैनिक पंचायत समीती सदस्य असतानाही पाथर्डी पंचायत समितीच्या इमारतीला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्याबद्दल विष्णुपंत पवार यांचा यावेळी अनेक मान्यवरांनी भाषणातून गौरव केला.
Post a Comment