मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढावले होते. दरम्यान पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी व एकूणच सर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात पावसासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे.
मुंबईसह राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने गेल्या काही दिवसांपासून दडी मारली. त्यामुळे शेतकर्यांच्या तोंडते पाणी। पळाले होते. आज येईल... उद्या येईल... म्हणत शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत होते. राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढावले होते.
हवालदिल झालेल्या शेतकर्याला हवामान खात्याच्या अंदाजाने दिलासा मिळालेला आहे. राज्यामध्ये गुरुवार (ता. आठ)पासून वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
कोकण, विदर्भातील अनेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुन्हा एकदा शेतकऱ्यांची नजर ही आकाशाकडे लागल्या आहेत. खरिपाचे पिके पावसामुळे वाचतील, अशी आशा लागली आहे.
Post a Comment