मुंबई : मुंबईसह संपूर्ण राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. त्यैमुळे आगामी पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पाऊस दमदार हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार नगर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शहरासह जिल्ह्यात झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
कोकणसह मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस ‘रेड अॅलर्ट’ जारी करण्यात आला असून मुंबई शहर व उपनगरासाठी चार दिवस ‘ऑरेंज अॅलर्ट’ जारी केले आहे.
गेले दोन-तीन दिवसांपासून मुंबई शहरात पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र आता जोर वाढणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केला आहे.
बंगालच्या उपसागरावर पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी, मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत.
जवळपास 20 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी, विभागांसाठी अॅलर्ट जारी केला आहे.
नगर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक छोटे तलाव या पावसाने भरले असून धरणांमध्ये नवीन पाण्यांची आवक सुरू झाली आहे.
Post a Comment