नगर : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. हा निकाल पाहण्यासाठी बोर्डाने दिलेल्या साईटमध्ये तांत्रिक अडचणी आल्या. निकाल पहाण्यात अडचणी आल्या तर ऑनलाइन अध्यापनात किती येत असतील, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. हा निकाल पाहण्यासाठी बोर्डाने काही वेबसाईटची लिंक विद्यार्थी व पालकांसाठी खुली करून त्यावर निकाल पाहण्याचे आवाहन केले होते.
दुपारी एक वाजल्यापासून त्यावर विद्यार्थी व पालक निकाल पहाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्यावर निकाल पाहण्यात अडचणी येत होत्या.
ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांना एव्हढ्या मोठ्या अडचणीला सामोरे दावे लागल्याने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
ऑनलाइन निकालात जर एव्हढ्या अडचणी येतात तर ऑनलाइन शिक्षणात किती येत असतील, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
ऑनलाइन शिक्षणात अनेक अडचणी येत आहेत. मात्र त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. फक्त ऑनलाइन अध्यापन करावे याचे आदेश दिले जात आहे.
मात्र ऑनलाइन अध्यापन खरोखर सुरळीत सुरु आहे का याचा आढावा मात्र शिक्षण विभागासह शिक्षण मंत्र्यांनी घेतला नाही.
ऑनलाइन दहावीच्या निकालाचे पितळ जसे उघडे पडले. तसेच पितळ ऑनलाइन अध्यापनाचे ही उघडे पडू शकते. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापन कसे होत आहे.
याची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यातून सर्व ऑनलाइन गोंधळ समोर येणार आहे. यावर आता शिक्षण विभाग व शिक्षण मंत्री काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment