श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या सदस्यांची या संदर्भात नुकतीच अयोध्येत बैठक झाली. ट्रस्टचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
त्यानुसार 2023 पर्यंत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, तर 2025 पर्यंत संपूर्ण 70 एकर परिसर तयार होणार आहे.
राम मंदिराचे कामकाज लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी आता दोन शिफ्टमध्ये काम केले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
याआधी 2024 पर्यंत राम मंदिराचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण आता 2023 अखेर पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
Post a Comment