दुकानाचे पत्रे उचकटून चोरी... हा मुद्देमाल लांबविला..


नगर : दुकानाचे पत्रे उचकटून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. रोख रकमेसह साहित्याची चोरी करण्यात आसी आहे.

दुतानाचे पत्रे उचकटून चोरांनी आत प्रवेश केला त्यानंतर दुकानातील गल्ल्यातील तीन हजार चारशे रुपयाची रक्कम, पारस कंपनीच्या दहा बादल्या व सहा मग्गे असे साहित्य चोरून नेले. ही घटना स्टेशन रस्त्यावरील मार्केट यार्डजवळ नेवासकर पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या दुकानात घडली. 

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी केदार बडवे (वय 36, राहणार हिरवे गल्ली, नालेगाव) यांच्या फिर्यादीवरून घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार महादेव शिंदे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post