कोहोकडी जिल्हा परिषद शाळेला लाखाची देणगी....


वडनेर ः 
जिल्ह्यात उपक्रमशील शाळा म्हणून लौकिक असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोहोकडी (ता. पारनेर)  शाळेला शिरूर(घोडनदी) येथील प्रसिद्ध व्यापारी व धरमचंद भवरीलाल सराफ अँन्ड ज्वेलर्स पेढीचे संचालक धरमचंद फुलफगर यांनी एक लाखाची मदत केली आहे. 
 
फुलफगर यांनी आपल्या वडील भवरीलालजी फुलफगर व आई कमलाबाई फुलफगर यांच्या स्मरणार्थ ही मदत केली आहे. धरमचंद फुलफगर यांनी टंचाईच्या काळात टँकरने मोफत पाणीपुरवठा करून शिरूर, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांची तहान भागविली आहे. देवस्थाने,व्रुध्दाश्रम, अनाथाश्रम व गरजवंतांना मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
 
कोहोकडी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी चालू असलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक कामाची दखल घेऊन सामाजिक कार्यात सातत्याने मदत करणारे प्रतीथयश व्यवसायिक धरमचंद फुलफगर यांनी कोहोकडी शाळेतील विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन पाण्याची टाकी बांधकामासाठी एक लाख रूपयांचा धनादेश शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय झरेकर व मुख्याध्यापक बाळासाहेब फटांगडे यांच्याकडे सुपूर्द केला. 
 
यावेळी देवेंद्र फुलफगर, महेंद्र फुलफगर, राळेगण थेरपाळ तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पांडुरंग कारखिले, सदस्य विठ्ठल चौधरी, माजी चेअरमन दगडू थोरात, संतोष चौधरी, शिक्षक गोकुळ कळमकर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post