एटीएम फोडण्याचा प्रयत्न


पारनेर :   टाकळी ढोकेश्वर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शेजारी असणार्‍या एटीएमची चोरी करण्याचा प्रयत्न झाला. बुधवार रात्री ते गुरुवार  पहाटे अडीच वाजेपर्यंत हा प्रयत्न झाला. चोरट्यांनी एटीएम पळविण्यासाठी चार चाकी वाहनाचाही वापर केला. लोखंडी तारेच्या वायरच्या साह्यने मशीन बांधून तोडण्याचा प्रयत्न केला.

टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेजवळील एटीएम चोरट्यांनी पहाटे 1 वाजून 55 मिनिटाने तोडण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, तीन चोरटे सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाले. एटीएम तोडण्यासाठी लोखंडी तारेचा वायररोप एटीएम मशीनला बांधून मशिन पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मशिन पूर्ण न निघता मधूनच तुटून मोठा आवाज झाल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. मशिनमधील 2829100 रुपये सुरक्षित असल्याचे देखभाल व्यवस्थापक विश्वास कसबे यानी सांगितले. 

दरम्यान घटनेची माहिती समजताच पोलिस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे, पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत उगले, पोहेकॉ लोणार, पोकॉ सुरज कदम, नगर येथील ठसेतज्ज्ञ यांनीही भेट देऊन पाहाणी केली. मात्र, सर्व पैसे सुरक्षित असल्याने सर्वांना हायसे वाटले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post