नगर ः कोरोनाचा आलेख सध्या वाढू लागल्यामुळे सगळ्याच स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. नियमांमध्ये शिथिलता मिळाल्याने सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरु झालेले असली तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियम मात्र अनेक ठिकाणी पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. त्याचा दुष्परिणाम कोरोनाचा आकडा वाढू लागलेला आहे. आज (शनिवारी) श्रीगोंदे, संगमनेर अन् पारनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आलेले आहेत.
जिल्ह्यात 852 बाधित आढळून आलेले आहेत. जिल्हा रुग्णालयातील तपासणीत 361, खासगी तपासणीत 233 व अँंटीजेन तपासणीत 258 जण बाधित आढळून आलेले आहेत. श्रीगोंद्यात 162., संगमनेरमध्ये 160, पारनेरमध्ये 109 बाधित आढळून आलेले आहेत. नेहमीच पारनेर व संगमनेर तालुके बाधिताच्या आकड्यात वाढ होत होती. परंतु आज श्रीगोंदे तालुक्यात वाढ होऊन जिल्ह्यात आघाडी घेण्यात आलेली आहे.
नगर शहरात अवघे 20 बाधित आढळून आलेले आहेत. ग्रामीण भागातील कोरोना बाधितांचा आलेख वाढत चालल्यामुळे सध्या चिंता व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.

Post a Comment