प्रेम कधी अन् कोणावर सांगता येत नाही. प्रेम हे काचेच्या भांड्यासारखे आहे. काचेला तडा गेल्यावर परत जोडल्या जात नाही. तसचं प्रेमाचा आहे. एकदा की त्याला तडा गेला की ते पुन्हा जोडलं जातं नाही. अशाच एका बहरलेल्या प्रेमाला तडा गेला असून प्रेमाच्या हिरवळीत आज माळरान दिसून येत आहे.
तसं त्याची अन् तिची फोटोवरून ओळख झाली. एका कार्यक्रमाला तो उपस्थित होता. पण तेथील फोटो त्याला मिळालेले नव्हते. फोटो हवे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या त्याच एका मैत्रीणीला फोन केला. तिनेही फोटो टाकण्याचा प्रयत्न केला. पण नेटवर्कची अडचण आली. त्यामुळे तिने आपल्या मैत्रीणीला फोटो पाठवण्याची विनंती केली.
तिनेही मैत्रीणीचा मान राखतं फोटो त्याला सेंट केले. त्यानेही फोटो मिळाल्यानंतर आभार मानसे. त्यानंतर नेहमी प्रमाने रोज सकाळी संध्याकाळी शुभ सकाळ, शुभ रात्रीचे मेसेज इतरांना पाठविले जात होते. तसेच नव्याने यादीत आलेल्या नंबरला सेंट होऊ लागले. सुरवातीला तिकडून कधी तरी रिपलाय येत होता. पण संदेश टाकणे त्याचे सुरुच होते. यातच त्या दोघांचे बोलणे सुरू झाले.
सुरवातीला तुटक असलेले बोलणे नंतर वाढत गेले. बोलण्या बोलण्यात मैत्री झाली. एकमेकांशी बोलणे सुरुच राहिले. एकमेकांना बोलल्याशिवाय वेळच जात नव्हता. तशी त्याची परिस्थिती नसल्याने तिच कायम फोन करून बोलतं होती. त्याचा खर्च टाळत होती. तोही मिळेल तसा वेळ काढून कामातून तिच्यासाठी देत होता. दोघांच्याही मनात प्रेम बहरलेले होते. पण प्रेमाचे रोपटे कोणी लावायचे हाच विचार दोघेही करत होते. (क्रमश:)


Post a Comment