देवरे यांच्या बदलीसाठी कर्मचार्यांचे उपोषण...


नगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची एक ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल झाले आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.  भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ज्योती देवरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान या प्रकरणावरून वेगवेगळे पडसाद उमटत असताना आज बुधवारी देवरे यांच्या समवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात काम बंद आंदोलन पुकारले आहे. 

पारनेर तालुका महसूल कर्मचारी व तलाठी संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे. तहसीलदार देवरे यांच्यावर दडपशाही व भ्रष्टाचाराचे आरोप करत चार दिवसांपूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना व मुख्य सचिवांना निवेदन दिले होते.

दोन दिवसांपूर्वी संघटनेने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले होते . या निवेदनात तहसीलदार देवरे यांची बदली करा अन्य आमची बदली करा अशी मागणी करण्यात आलेली आहे. 

दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचारी व पारनेर तालुक्यातील तहसीलदार मंडलाधिकाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील महसूलचा कारभार सध्या ठप्प झाला आहे. तहसील कार्यालयाच्या दारातच हे काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post