नगर : जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे शासनाचे आदेश नसताना काही शाळा सुरू आहेत . यामुळे या शाळा बंद करा, अथवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मेस्टाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून कोणतेच आदेश नसताना जिल्ह्यातील काही भागात जिल्हा परिषद व नगर पालिका हद्दीत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांचे वर्ग सर्रासपणे सुरू आहेत.
ते तातडीने बंद करण्यात यावेत, अन्यथा मराठी माध्यमाच्या शाळांच्या धर्तीवर इंग्रजी शाळांचे वर्ग भरविण्यास परवानगी देण्यात यावी, 15 टक्के फी कपातीचा निर्णय सरकारने मागे घ्यावा अथवा या फीचा सरकारने संबंधीत, शाळांना परतावा करावा, चार वर्षापासून थकीत आरटीईचा परतावा तातडीने करावा.
सन २०२०-२१ चे प्रतिपूर्तीचा दर आठ हजार राहिल, हा शासन आदेश तातडीने मागे घ्यावा, इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंत आरटीई कोठ्यातून प्रवेश घेतलेले बालके शाळा सोडून गेल्यास ती जागा, संबंधीत शाळेला ऑनलाईन अथवा आफॅलाईन भरण्यास परवागनी मिळावी, आरटीई २५ टक्के मोफत शिक्षणाचा कायदा नर्सरी ते १२ वीपर्यंत लागू करण्यात यावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत.
यावेळी मेस्टाचे अध्यक्ष देवीदास गोडसे, अशोक चौधरी आणि संदीप देवगिरे आदी उपस्थित होते.

Post a Comment