पाथर्डी : मोहोजदेवढे व परिसरातील वाड्यावस्त्यावरील रस्ते, पूल, सभागृह व बंधारे ही विकासाची कामे आपण केलेली आहेत. आणखी कामे करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. तुम्ही दिलेले प्रेम राजळे कुटुंब कधीच विसरणार नाही. जलयुक्त शिवार योजनेमुळे जलसंधारणाची मोठी कामे झाली म्हणून आज येथील पाण्याची पातळी चांगली राहिली आहे. शेतकरी सुखी असेल तरच राज्य सुखी राहते, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
तालुक्यातील रुपनरवाडी येथील राम मंदिरासमोर आमदार मोनिका राजळे यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपयांच्या सभागृहाच्या कामाचे भुमिपूजन तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले.
पंचायत समितीच्या सभापती सुनिता दौंड, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, विष्णुपंत अकोलकर, सुभाष केकाण, सरपंच अर्चना हाके, नारायण पालवे, भगवान गर्जे, भगवान आव्हाड, कैलास देवढे, पंडीत देवढे, अजित देवढे, रमेश हंडाळ, महादेव जायभाये, लक्ष्मण काळे, रावसाहेब रुपनर, गणेश चितळकर, गहीनीनाथ काटे, बाळासाहेब सावंत, तुकाराम देवढे, महादेव रुपनर, अशोक रुपनर, दिलीप रुपनर, अनिल ढोले, युनूस शेख, गणेश देवढे आदी उपस्थित होते.
राजळे म्हणाल्या, दुष्काळी भागाचा विचार करुन पैठणच्या धरणाला नदीतून वाहून पाणी अडविण्यासाठी विशेषबाब म्हणून पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील गावांना जलसंधारणाच्या कामाला परवानगी मिळविण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु.
तुम्ही या भागातील ग्रामपंचायतीनी ठराव करावेत. शेतीसाठी पाणी मिळणे गरजेचे असल्याने या भागात पाणी अडविण्यासाठी आपण संघटीतपणे संघर्ष करु. राज्यात भाजपाचे सरकार आसताना पंकजा मुंडे व राम शिंदे यांच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारणाच्या कामांना मोठा निधी मिळाला व कामे करता आली. रस्ते, पूल, सभागृह ही कामेही केली.
सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री सडक योजनेतुन चाळीस हजार किलो मीटर रस्ते करू असे जाहिर केले. परंतु एक किलो मीटर रस्ता तयार केला नाही. दोन वर्षापासून कोरोनाच्या नावाखाली विकासकांमांना निधी देण्यास टाळाटाळ करत आहे. तुम्ही संघटीतपणे रहा कितीही अडचणी आल्या तरी केंद्र सरकारच्या माध्यमातुन निधी आणून विकास कामे सुरू ठेवू.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक गोविंद रुपनर स्वागत बाळासाहेब रूपनर,सुत्रसंचालन सुखदेव मर्दाने यांनी तर आभार शहादेव रुपनर यांनी मानले.
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथशास्त्री म्हणाले की आपल्याला मोनिका राजळे सारख्या चांगल्या आमदार लाभल्या आहेत. मी त्यांची स्तुती करत नाही. मात्र त्यांचा स्वभाव चांगला आहे. त्या सर्व जनतेला आईची माया देतात. विकास कामे मार्गी लाण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड असते. प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होतात. आपण आसेपर्यंत त्या आपल्या आमदार असाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार मोनिका राजळे यांचे कौतुक केले.

Post a Comment