विखे अन् पाचपुते यांची श्रीगोंद्यात दुचाकीवर सवारीने विरोधक झाली कावरीबावरी...


अमर छत्तीसे

श्रीगोंदा : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी नोव्हेंबरपासून सुरु होणार असली तरी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरु झालेली आहे. परंतु आरक्षणाची भीती असल्याने अनेकांनी छुप्या पध्दतीने पाऊले टाकून गट व गणात चाचपणी सुरु केलेली आहे. त्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या इच्छुकांची समावेश आहे. परंतु खासदार डॉ. सुजय विखे व आमदार पाचपुते यांनी दुचाकीवर शहरात सवारी केल्याने विरोधक कावरीबावरी झालेला आहे.

लोकसभा निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांना मदत केली. त्यानंतर विखे यांनीही आमदार बबनराव पाचपुते यांना विधानसभेला मदत केली. त्यानंतर थोडेफार दोघांमघ्ये अंतर पडले. परंतु हे अंतर दोघांच्या दृष्टीने आगामी काळासाठी डोकेदुखीचे ठरणारे आहे. हे लक्षात आल्यानंतर परत दोघांनी मिळते जुळते घेतले. श्रीगोंदा पंचायत समितीच्या उपसभापती नावजी विखे अन् पाचपुते एकच असल्याचे चित्र दिसून आले. अशक्य असणारे यश खेचून आणण्यात आले.

आढळगाव गटात विविध विकास कामांचे उदघाटन विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार बबनराव पाचपुते ही उपस्थित होते. याच विकास कामांच्या कार्यक्रमांच्या उदघाटनाच्या रेलचेलमध्ये विखे व पाचपुते यांनी दुचाकीवरून फेरफटका मारला. विखेंनी दुचाकी चालवत पाचपुतेंना मागे बसविलेले छायाचित्र समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले. याविषयी तर्कवितर्क ही लढविले गेले. 

विखे व पाचपुते यांची सुचलेली सुसाट दुचाकीचा विरोधकांनी धसका घेतला आहे. आगामी निवडणुका आपल्याला अवघड जातील, असाच अंदाज या फेरफटक्यावरून बांधला आहे. त्यामुळे कॉग्रेस व राष्ट्रवादीला आता आगामी निवडणुकात या विखे व पाचपुते यांच्या सुसाट दुचाकीला आवरणे अशक्यप्राय ठरते की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post