अमर छत्तीसे
श्रीगोंदे : गोरगरीब रुग्णांची सेवा केल्यावर जे समाधान मिळते. त्यापेक्षा दुसरे कोणतेही समाधान नाही, असे प्रतिपादन वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉ गोपाल बहुरुपी पाटील यांनी केले.
आढळगाव येथे आयोजित नागरी सत्कार प्रसंगी बोलताना केले. डॉ. गोपाल बहुरुपी पाटील यांना नुकताच राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्तम डायबेटिस सेंटर म्हणून पुरस्कार मिळाला. त्यामुळे आढळगाव येथे त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.
डॉ बहुरुपी पाटील म्हणाले की, मी एका सामान्य कुटुंबात जन्मलेला असल्यामुळे मला गरिबीची जाण आहे. म्हणून गोरगरिबांची रुग्ण सेवा केल्यावर जे समाधान मिळते. ते समाधान सर्वोत्तम समाधान असते.
तसेच डायबेटिस हा आजार घाबरण्यासारखा नाही आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर निश्चितच हा आजार बरा होतो. आपण आतापर्यंत लाखो रुग्णांना यातुन बरे केले आहे, असे डॉ. गोपाल बहुरुपी पाटील म्हणाले.
यापुढे ही ग्रामीण भागातील रुग्णांना आपण सेवा देणारच आहोत. आढळगाव परिसरातील रुग्णांनी आपल्या कोणत्याही समस्शेसाठी नगर येथे आपले हक्काचे रुग्णालय म्हणून माझ्याकडे यावे, असे आवाहनही डॉ. गोपाल बहुरुपी पाटील यांनी केले.
यावेळी माजी अध्यक्ष देवराव शिंदे सुरेंद्र गांधी, उत्तम राऊत, किसन शिंदे, संदीप सुर्यवंशी, बाळासाहेब शिंदे, रंगा डोके, बापू शिंदे, शरद गव्हाणे, अंबादास चव्हाण, राजेश वाकडे, संजय गिरमकर, नवनाथ शिंदे, सतीश काळे, संतोष सोनवणे, संतोष गव्हाणे, संदीप काळाने, गणेश गव्हाणे, डॉ. अनिल घोडके, डॉ. नेमिचंद निकम, लहू डेबरे आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक योगेश वाकडे यांनी केले. श्रीकांत ठवाळ यांनी आभार मानले.

Post a Comment