नगर : जिल्ह्यात बाधिताचा आकडा कमी जास्त होत आहे. संगमनेर, अकोले व श्रीगोंद्यात चिंता कायम आहे. आज बाधिताचा आकडा 734 झाला आहे. पारनेर तालुक्याला थोडा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात बाधितांचा आकडा 724 झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या चाचणी अहवालात 101, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 285, तर अँटीजेन चाचणीत 348 असे एकूण 734 कोरोना बाधित आढळून आले.
संगमनेर तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली. संगमनेरमध्ये 147 जण बाधित आढळून आलेले आहेत. अकोले तालुक्याने आज आघाडी घेत दुसरे स्थान मिळविले आहे. अकोलेमध्ये 105 जिल्ह्यात दुसर्यास्थानी आहे.
श्रीगोंदा तालुका आज तिसर्यास्थानी आलेला आहे. अकोले तालुक्यामध्ये 87 बाधित आढळले आहेत. नगर शहरात दिवसभरात बाधिताचा आकडा वाढला आहे. दिवसभरात आढळून 202 आलेले आहेत. पारनेर तालुक्याला आज दिलासा मिळाला आहे. पारनेरमध्ये 64 बाधित आढळले आहेत.
संगमनेर - १४७, अकोले - १०३, श्रीगोंदा - ८७, पारनेर - ६४, शेवगाव - ४७, कर्जत - ४४, नगर ग्रामीण - ३८, राहुरी - ३८, राहाता - ३४, नेवासा - ३१, पाथर्डी - २७, मनपा - २२, कोपरगाव - १८, श्रीरामपूर - १८, जामखेड - १२, इतर जिल्हा - ०४

Post a Comment