राहात्यात डाळिंबाच्या भावात वाढ...


राहाता ः राहाता बाजार समितीत डाळिंबाची 23 हजार क्रेडस आवक झाली. भावही एक नंबर डाळिंबाला चांगला मिळाला आहे.

राहाता बाजार समितीत बुधवारी डाळिंबाचे लिलाव झाले. एकूण 22 हजार 800 क्रेडस डाळिंबाची आवक झाली हाेती.  

यामध्ये एक नंबर डाळिंबाला 96 ते 135,  दाेन नंबरला ः 71 ते 95, तीन नंबर डाळिंबाला ः 36 ते 70, चार नंबर डाळिंबाला ः अडीच रुपये ते 35 रुपये किलाेचा भाव मिळाला.

मंगळवारी डाळींबाच्या 27 हजार क्रेटसची आवक झाली होती. यामध्ये एक नंबर डाळिंबाला 96 ते 125 रुपये किलोचा भाव मिळाला होता. त्यात आज वाढ झाली आहे.

डाळिंबाला मागणी असल्याने भावही चांगला मिळत आहे. कोरोनामुळे व्यापारी खरेदीला येण्याचे प्रमाण कमी आहे. त्याचा भावावर काहीसा परिणाम होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post