पारनेर ः पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव आज (शुक्रवारी) झाले. कांद्याची आवक साडेनऊ हजार गोण्या आवक झालेली आहे. एक नंबर कांद्याला 1900 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.
पारनेर बाजार समितीत सहा हजार 525 कांदा गाेण्यांची आवक झाली हाेती. यामध्ये एक नंबर कांद्याला 1800 ते 1900, दाेन नंबर कांद्याला दीड हजार ते 1700, तीन नंबर कांद्याला एक हजार ते 1400 व चार नंबर कांद्याला 200 ते 900 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळाला.
शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करूनच कांदा विक्रीस आणावा, असे अावाहन पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.
बाहेरील राज्यातील व्यापारी कांदा खरेदीसाठी येण्याचे प्रमाण कमी झालेले आहे मागणी कमी व पुरवठा जास्त होत असल्यामुळे कांद्याच्या भावावर परिणाम होत आहे.

Post a Comment