राहात्यात कांदा इतक्यावर स्थिरावला


राहाता ः
राहाता बाजार समितीत कांद्याला मागणी कमी झाल्यामुळे भाव कमी झालेला आहे. एक ते तीन व जोड कांदा स्थिरावलेला आहे. गोल्टी कांद्यात मात्र 100 रुपयांनी घसरण झालेली आहे. एक नंबर कांद्याला 1800 रुपयांचा प्रतवारीनुसार भाव मिळाला आहे.

राहाता बाजार समितीत कांद्याच्या साडे बारा हजार कांदा गोण्यांची आवक झाली.  एक नंबर कांद्याला 1800 रुपयांचा भाव मिळाला होता.  

कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः 1400 ते 1800, दोन नंबर कांदा ः 850 ते 1350, तीन नंबर कांदा ः 400 ते 800, गोल्टी कांदा ः 1200 ते 1400, जोड कांदा ः 100 ते 500.

कांद्याला मागणी की झालेली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम भावावर होत आहे. कांद्याला मागणी वाढल्यानंतर भाव वाढ होईल, अशी आशा सर्वांना लागलेली आहे.   

कांद्याची प्रतवारी करून कांदा बाजार समितीत आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळासह सचिवांनी केले आहे.

राहाता बाजार समितीत डाळिंबाची 18 हजार 246 क्रेडस आवक झाली. एक नंबर डाळिंबाला 125 रुपये किलोचा सर्वाधिक भाव मिळाला. डाळिंबाचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर डाळिंब ः 91 ते 125, दोन नंबर ः 61 ते 90, तीन नंबर ः 31 ते 60, चार नंबर ः अडीच ते 30 रुपये किलो दराने विक्री झाला.

डाळिंबासह कांद्याची प्रतवारी करून शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post