संगमनेर : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी चालकाने बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्या घटना संगमनेरमध्ये घडली आहे.
बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी ( दि . २१ ) सकाळी साडे सहाच्या सुमारास एम . एच . १४ , बी . टी . ४८८७ क्रमांकाच्या पाथर्डी - नाशिक या बसमध्ये याच बसच्या चालकाने संगमनेर बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
सुभाष तेलोरे ( रा . कोल्हार कोलूबाईचे , ता . पाथर्डी , जि . अहमदनगर ) असे या चालकाचे नाव आहे. चालकाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे एसटी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Post a Comment