नगर ः कोरोनचा आलेख कमी जास्त होत आहे. प्रशासाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी कोरोनाचा आलेख कमी होत नसल्याने आता प्रशासनाने कडक भूमिका घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकतीच आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. त्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिलेले आहे. हे वाचले का ः ग्रामपंचायतींचे कारभारावर तक्रारी वाढल्या... या बैठकीमुळे आज (मंगळवार)पासून नगर शहरात पोलिसांकडून विना मास्क असणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु केलेली आहे.
कोरोनाचा आलेख सध्या कमी जास्त होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे प्रशासनाने आगामी काळात वाढणारे संकट टाळण्यासाठी आतापासून हालचाली सुरु केलेल्या आहेत. नियमात दिलेली शिथिलता आता कडक करण्याच्या हालाचाली सुरु केलेल्या आहेत.
जिल्ह्यात आता कोरोना तपासणी वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने हाती घेतलेले आहे. लसीकरण मोहिम जिल्ह्यात चांगली राबविली जात असली तरी बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केलेली जात आहे. हे नक्की वाचा एकदा ः नेवाशातील राजकीय वातावरण थंडचं... या कोरोना परिस्थितीमुळे अद्याप शाळा व महाविद्यालय सुरु झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे.
पोलिसांकडून सुरु करण्यात आलेल्या विनामास्क कारवाईचा अनेकांना झडका बसलेला आहे. मात्र पोलिसांनी ही कारवाई ठरावीक चौकांपुरती मर्यादीत न ठेवता थोडया थोडया वेळाने सर्व शहरातील रस्त्यांवर ही मोहिम राबविणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क वापरण्याची शिस्त कायमस्वरुपी लागेल, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Post a Comment