नगर ः कोरोनाचा आलेख अचानक वाढला आहे. आज (मंगळवारी) संगमनेर, पाथर्डी अन् पारनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आलेले आहेत.
जिल्ह्यात 953 बाधित आढळून आलेले आहेत. जिल्हा रुग्णालयातील तपासणीत 293, खासगी तपासणीत 106 व अँंटीजेन तपासणीत 297 जण बाधित आढळून आलेले आहेत. संगमनेरध्ये 186, राहुरीमध्ये 106 व अकोलेमध्ये 91 बाधित आढळून आलेले आहेत.
नगर शहरात बाधित रुग्ण वाढले आहे. दिवसभरात 41 बाधित आढळून आलेले आहेत. ग्रामीण भागातील कोरोना बाधितांचा आलेख वाढत चालल्यामुळे सध्या चिंता व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.

Post a Comment