गावठी कट्यासह एकाला पकडले...

नगर ः शहरातील केडगाव उपनगरात बुधवारी (ता. 29) संशयास्पदरित्या रात्री साडे अकरा वाजता फिरणारा सराईत आरोपी भूषण रजनीकांत निकम (वय 40, काकासाहेब म्हस्के रस्ता, एमआयडीसी) यास कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्याच्या अंगझडतीमध्ये एक गावठी कट्टा व सहा जिवंत काडतुसे आढळून आले.


केडगाव उपनगरात एक तरूण दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरत असल्याती माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकाला संशयास्पदरित्या फिरणाऱ्या व्यक्‍तीचा शोध घेण्यासाठी पाठविले. 

या पथकाने आरोपी भूषण निकम याला चौकशीसाठी सुरवातीला ताब्यात घेतले.  त्याच्याकडे एक गावठी कट्टा व सहा काडतुसे आढळून आले. 

त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, तो 2012 पासून गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय आहे. त्याच्यावर राहुरी आणि भिंगार पोलिस ठाण्यात दरोडे, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post