ऑनलाइन ग्रामसभेला ग्रामस्थांचा प्रतिसाद...


राहाता : तालुक्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायत कडून शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाईन ग्रामसभा सरपंच श्जनार्दन चंद्रभान घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी मतदारसंघाचे पहिले आमदार चंद्रभान (दादा)घोगरे पाटील सभागृहातून ऑनलाईन घेण्यात आली. या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला.

सभेत सर्व प्रथम ग्रामसभेत मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचण्यात आले. त्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर शासकीय विषय घेण्यात आले. त्यानंतर सरपंच जनार्दन घोगरे यांच्या परवागीने ऐनवेळी ग्रामस्थांनी नागरी सुखसुविधा बाबत विशेषतः गटार  योजना, पाणीपुरवठा, लाईट व्यवस्था याबाबत असलेल्या अडीअडचणीचे विषय मांडले.


त्यास सरपंच जनार्दन घोगरे यांनी नागरिकांचे समाधान होईपर्यंत विषय समजावून घेऊन उत्तर दिली. सर्व ग्रामस्थांना ग्रामपंचायत मार्फत होणारे प्रस्तावित सर्व कामांची माहिती ग्रामविकास आधिकारी श्री गणेश दुधाळे यांनी दिली.

ग्रामसभेच्या शेवटी सरपंच जनार्दन घोगरे यांनी सर्व सूचनाचा दखल ग्रामपंचायत घेणार असल्याची ग्वाही सर्व ग्रामस्थाना दिली आपल्या ग्रामपंचायतीने सरपंच आपल्या दारी हे अभियान सुरु केले आहे.  कोविडच्या प्रादुर्भाव संपर्कात काही आडचणी येत आहे. 

आपली ग्रामपंचायत ही गावाची आहे आपली सेवा करणे हे ग्रामपंचायतीचे आद्य कर्तव्य अजून गावातील अनेक ग्रामस्थ आज ऑनलाईन ग्रामसभेमुळे आपले प्रश्न मांडू शकले नसतील तरी त्या सर्वानी ग्रामपंचायतीमध्ये येवून आपले प्रश्न सांगावे म्हणजे आपल्या प्रश्नाचे निरसन करुन उपाय योजना करता येणे शक्य होईल. 

तसेज शासनाचा शेतकऱ्यांचा महत्वाकांक्षी ई- पिकपाहणी  मध्ये सहभाग घेण्याचे अवाहन सरपंच घोगरे यांनी केले. कोविडमुळे मृत झालेल्या नागरिकांना त्यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करुन ऑनलाईन उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना धन्यवाद देऊन ग्रामसभेचे कामकाज पूर्ण झाले.

ग्रामसभेस रयतचे सदस्य एकनाथ घोगरे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत मापारी, उत्तमराव आहेर, आनिल आहेर, रणजित आहेर, अप्पासाहेब घोगरे, शिवाजी कुरुकुटे, मुन्ना आहेर, कैलास आहेर, दिपक घोगरे, दिलिप आहेर, उपसरपंच आर्चना आहेर सर्व ग्रामपंचायत सदस्य, शासकीय कर्मचारी ग्रामस्थ ऑनलाईन उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post