लोणी खुर्द ग्रामपंचायतमध्ये श्रींची प्रतिष्ठापणा...


राहाता : लोणी खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामंस्थाच्या आग्रहास्तव ग्रामपंचायत कार्यालयात कर्तव्यदक्ष सरपंच जनार्दन घोगरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून गणरायांची स्थापना करण्यात आली.

गेले दोन वर्षापासून या जगावर असलेले कोरोनोच्या संकटाचा आगामी काळात लवकरात लवकर शेवट व्हावा आणि गोरगरीबांच्या मुखी दोन घास सुखाचे पडावे अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी सरपंच घोगरे यांनी केली.

सरपंच जनार्दन घोगरे म्हणाले, श्री गणेशाची स्थापना हा जनमाणसापर्यत वेगळा संदेश जाणारा सार्वजनिक उत्सव आहे. खोट्याचं खरं करणारी मंडळी या देशातून हद्दपार करण्यासाठी प्रत्येक वर्षी गणरायाची स्थापना होत असते. त्यात काही प्रमाणात यश निश्चित मिळत असते. ते या ही वर्षी येईल, असा विश्वास वाटतो सर्व ग्रामस्थ व गणेश भक्तांना उत्सवाच्या शुभेच्छा सरपंच घोगरे यांनी दिल्या. 

कोरोनो चे सर्व नियम तंतोतंत पालन करुन अनंत चतुर्दशी च्या दिवशी पर्यावरणाची काळजी घेवून गणेश विसर्जन करण्याचे अवाहन सरपंच घोगरे यांनी केले.

या वेळी ग्रामविकास आधिकारी गणेश दुधाळे, आप्पासाहेब घोगरे, श्रीकांत मापारी, भास्कर आहेर, विलास घोगरे, कैलास आहेर, उत्तमराव आहेर, बाळासाहेब आहेर, मायकल ब्राम्हणे, प्रदीप ब्राम्हणे, आनिल आहेर, दिलीपराव आहेर, सतिश आहेर, रणजित आहेर, सुहास आहेर, जालु मापारी, सचिन (मुन्ना) आहेर, आमोल कोरडे, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post