कोरोनाचे गंभीर्यच नाही.. गटनेते जालिंदर वाकचौरे यांचा आरोप...


नगर ः
जिल्ह्यात लस आहे, पण पॅरासिटामॉल गोळ्या व सिरीन नाही. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात सिरीन व गोळ्याच नाही. कोरोनाचा इतका मोठा प्रादुर्भाव असताना जिल्ह्यात मात्र राज्य शासनाचा व जिल्हा परिषदेचा दुर्लक्ष चालू आहे, असा आरोप जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  एकीकडे विकास कामांना निधीचा कट लावून कोरोनासाठी वळविला आहे. परंतु ज्या मूलभूत गरज आहे. तिकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. मग कोरोनासाठी निधी कपात केला. तो गेला कुठे एकीकडे केंद्र सरकार लस उपलब्ध करून देते. परंतु जिल्ह्यात मात्र राज्य सरकार व जिल्हा परिषद दुर्लक्ष करताना दिसते, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

खरंतर 14 व्या वित्त आयोगाचा व्याजाचे 26 कोटी रुपये राज्य सरकारने अन् अधिकाराने जमा केले. त्या काही रकमेत रुग्णवाहिका अर्सनिक अल्बम घेण्यात आले. परंतु अनेक ठिकाणी रुग्णवाहिकेला डिझेलच नाही. बर्याच मूलभूत गरजा आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जिल्ह्यातल्या शंभर आरोग्य केंद्रात आज सेरिन व पॅरासिटॅमॉल गोळ्या उपलब्ध नाही. त्या ठिकाणी हॅन्ड ग्लोज व मास्क इत्यादी वापरात येणाऱ्या वस्तू आज प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध नाही.

जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समिती स्थापन केलेली असते. त्या रुग्ण कल्याण समितीला काही निधी जिल्हा परिषद देत असते. परंतु अनेक दिवसापासून रुग्ण कल्याण समितीला निधी न दिल्यामुळे त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात थोडाफार खर्च करण्यासाठी निधी नाही आणि म्हणून प्रार्थमिक उपचाराच्या गोळ्या किंवा सेरिन खरेदी करता येत नाही. एकीकडे कोरोनामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट आहे त्यावर लसीकरण हाच पर्याय आहे. तरी लस उपलब्ध असून सेरिन व गोळ्या तातडीने प्रत्येक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून द्याव्यात.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेची आरोग्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे असते परंतु जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी नको त्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करते परंतु या गंभीर विषयाकडे लक्ष देत नाही. याच कोरोनाच्या कारणास्तव जिल्हा नियोजन समिती आपत्कालीन व्यवस्था व थेट राज्य सरकार या सर्वांचा कोट्यावधी रुपयाचा निधी कोरोनासाठी खर्च केला मग तो खर्च गेला कुठे याचीही चौकशी झाली पाहिजे, असेही वाकचौरे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post