साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निवडी ठरणार डोकेदुखी


शिर्डी ः
साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर कोणाची वर्णी लागणार या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे.परंतु या निवड प्रक्रियेवरून आता कही खुशी कही गम अशी अवस्था निर्माण झालेली आहे. काहींनी जल्लोष केला तर काहींनी समाज माध्यमाद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.

साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची निवड प्रक्रियेवर गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. ही चर्चा आता थांबलेली आहे. अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अॅड. जगदीश सावंत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर जयंत जाधव, महेंद्र शेळके, सुरेश वाबळे, अनुराधा आदिक, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, राहुल कनाल, सुहास आहेर व अविनाश दंडवते यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आधी राजकीय निर्णय होत नसल्याने आणि नंतर न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही नियुक्ती दीर्घकाळ रखडली होती. 

ही निवड होण्याअगोदर दोन याद्या तयार झालेल्या होत्या. त्या समाज माध्यमावर व्हायरलही झाल्या होत्या. त्यावरून अनेकांनी त्या यादीतील विश्वस्तांचे अभिनंदनही केले होते. परंतु  या दोन याद्यांमुळे आता चांगलाच  घोळ झालेला असून ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांमधून उघड नाराजी व्यक्त केली जात आहे. 

आमची निवड टाळली तर आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत धडा शिकविण्यात येईल, असेही काहींनी कार्यकर्त्यांजवळ बोलवून दाखविलेले आहे. त्यामुळे साईबाबा संस्थानची निवड प्रक्रिया आता पक्षांसाठी डोकेदुखी ठरणा आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post