कर्जतमध्ये राजकीय भूकंप होणार....भाजपाचा एक नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर...

 

अमर छत्तीसे

श्रीगोंदा : कर्जत तालुक्यात या अगोदर छोटे-मोठे राजकीय भूकंप झालेले आहेत. मात्र नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भूकंपाच्या धक्क्यानंतर मोठी राजकीय उलथापालथ होऊन नगर पंचायतची निवडणूक राष्ट्रवादी एकहाती जिंकणार आहे.

विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघाची जागा भाजपाच्या ताब्यातून मिळवत राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले आहे. आमदार रोहित पवार यांनी विजय मिळविण्यापासून आजपर्यंत अनेक विकास कामे केलेली आहे. या कामांच्या जोरावर ते मतदारसंघात लोकप्रिय ठरलेले आहे. त्यामुळे भाजपातील अनेकजण आता राष्ट्रवादीत दाखल होत आहे. 


मागील काही दिवसांपूर्वीच भाजपाचे प्रसाद ढोकरीकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ढोकरीकर गेल्या अनेक दिवसांपासून भाजपातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करीत होते. ढोकरीकर यांच्या या प्रवेशामुळे भाजपाची ताकद कमी झालेली आहे. त्यांच्याबरोबर इतरही काहीजण राष्ट्रवादीत दाखल झालेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढलेली आहे.

त्यातच आता भाजपाचा एक मोठा नेता  राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या नेत्याची कर्जत शहरासह तालुक्यात.मोठी ताकद असून या नेत्याकडे मागील पंचवार्षिक निवडणुकीत विधानसभेचा दावेदार मानले जात होते. या नेत्याने निवडणुकीसाठी तयारी केसी होती. मात्र पक्षाच्या आदेशाने त्यांनी भाजपाचे उमेदवार यांच्या निवडणुकीची जबाबदारी स्वीकारून कामकाज केले.

हा नेता माजी मंत्री राम शिंदे यांचा कट्टर समर्थक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा नेता भाजपात अस्वस्थ दिसून येत आहे. या नेत्याकडून अद्याप प्रवेशाबाबत निश्चिती झालेली नसली तरी या संदर्भात बैठका झालेल्या आहेत. मात्र त्यात या प्रवेशाबाबत एकमत झालेले नाही. परंतु लवकर यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु हा निर्णय काय होतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपाच्या त्या नेत्याने जर राष्ट्रवादीत प्रवेश केला तर राष्ट्रवादीची ताकद वाढणार असून नगर पंचायतची निवडणूक एकहाती जिंकली जाणार आहे. या नेत्याने राष्ट्रवादीत यावे यासाठी राष्ट्रवादीचे सर्वजण प्रयत्न करीत आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post