मोबाईल हिसकावणारे जेरबंद


नगर : शहरातील बोल्हेगाव उपनगरातून दुचाकीवरील चाललेल्यांचा  मोबाईल हिसकावून चोरून नेणार्यांना जेरबंद करण्यात आले आहे. ही कामगिरी स्थानिक अन्वेषणच्या पथकाने केली आहे.  

प्रेम नरेंद्र भाकरे व आशिष अशोक भाकरे (दोघे रा. नागापूर) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. 

वैष्णवी सुभाष लाटे (वय 22, बोल्हेगाव) या भावासमवेत वडिलांचा जेवणाचा डब्बा देऊन दुचाकीवरून दि. 19 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी घरी येत होत्या. त्यावेळेस दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वैष्णवीच्या भावाच्या हातामधील पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला.

लाटे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध रस्ता रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, नागापूर येथील प्रेम नरेंद्र भाकरे व आशिष अशोक भाकरे या दोघांनी ही रस्ता लूट केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्‍या दाखविताच, त्यांनी रस्ता लुटीची कबुली दिली. चोरलेला मोबाईल ही काढून दिला.

प्रेम भाकरे हा सराईत आरोपी आहे. त्याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. एका महिलेचा विनयभंग करणे, अल्पवयीन मुलीवर अत्याचार तसेच मुंबई पोलिस अधिनियमाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल आहे. आशिष भाकरे यांच्यावर ही अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा एक गुन्हा दाखल आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post