नगर ः जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा कधी कमी जर कधी जास्त होत आहे. दिवसभरात 731 बाधित आढळून आलेले आहेत. यामध्ये संगमनेर, पाथर्डी, श्रीगोंदा अन् पारनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आलेले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहे. या प्रयत्नांवर काही बेफिकिरांकडून पाणी फेरण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे कोरोनाचा आलेख कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. तो रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जिल्हा रुग्णलयाच्या तपासणी अहवालात 167, खासगी तपासणीत 327 तर रॅपिड चाचणीत 237 जण बाधित आढळून आलेले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 188 रुग्ण बाधित आढळून आलेले आहेत.
दुसर्यास्थानी आज पाथर्डी व श्रीगोंदा तालुक्याने झेप घेतलेली आहे. पाथर्डी व श्रीगोंद्यात प्रत्येकी 62 बाधित आढळून आलेले आहे. तिसर्यास्थानी पारनेर तालुका असून पारनेरमध्ये 60 जण बाधित आढळून आलेले आहेत. नगर शहरात बाधितांचा आकडा आज वाढलेला दिसून येत आहे. नगरमध्ये 31 बाधित आढळून आलेले आहेत.
Post a Comment