नगर :- महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील बुधवारी (दि.29)ला जिल्हा दौर्यावर येत आहे.
बुधवार सकाळी साडेनऊ ते साडेअकरा वाजता जिल्हा जलसंपदा विभागाच्या अधिका-यांसमवेत आढावा बैठक घेणार आहेत. ही बैठक शासकीय विश्रामगृह येथे होणार आहे.
सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेबारा दरम्यान ग्रामीण जिल्हा कार्यकारणीची आढावा बैठक राष्ट्रवादी भवनमध्ये घेणार आहेत. दुपारी साडेबारा ते दीड दरम्यान अहमदनगर शहर जिल्हा कार्यकारणी बैठक राष्ट्रवादी भवनात घेणार आहे.
दुपारी दीड ते दुपारी दोन ही वेळ सुपा येथे राखीव आहे. दुपारी तीन ते चार दरम्यान पारनेर विधानसभा मतदार संघ आढावा बैठक पारनेर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात घेणार आहेत.
सायंकाळी साडेपाच ते साडेसहा वाजता श्रीगोंदा येथे आगमन व श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक श्रीगोंद्यातील तुळशीदास मंगल कार्यालयात घेणार आहेत. सायंकाळी साडे सहा ते साडे सात ही वेळ राखीव आहे.
रात्री 8 वाजता मोटारीने श्रीगोंदा येथून अहमदनगरकडे प्रयाण करणार आहेत. नगर येथे ते मुक्काम करणार आहेत.
Post a Comment