सिगारेटचा तुकड्याचा पुरावा महत्वपूर्ण ठरला... पत्नीच्या खूनाबद्दल पतीला जन्मठेप


नागपूर :
  पत्नीवर संशय घेत सहा वर्षांपूर्वी पतीने पत्नीचा खून करण्यात आलेला आहे. याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपी पतीला दोषी ठरविले होते. नागपूर खंडपीठापुढे सुनावणीसाठी आलेल्या हत्येच्या एका प्रकरणात न्यायालयाने सिगारेटचा तुकडा पुरावा म्हणून ग्राह्य धरत दोषी पतीला ठरविले. त्याला त्याच्या पत्नीच्या हत्येबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशह पोलिस ठाण्याच्या अंतर्गत 2015 मध्ये महिलेची हत्या करण्यात आली होती. विवाहबाह्य संबंधामुळे पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होऊन भांडण होत असे. या वादातून पत्नी सविता जावळे हिची पती रमेश जावळे यांने हत्या केली, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

दोषी पती रमेश जावळे याने हत्येचा दिवशी आपण घटनेच्या ठिकाणी नव्हतो, आपण त्या दिवशी नागपूरला गेलो होतो, असा दावा केला होता. पण घटनास्थळी मिळालेल्या सिगारेटच्या तुकड्यावरून आणि त्याला लागलेल्या थुंकीच्या डीएनए चाचणीचा अहवाल महत्वाचा पुरावा मानून न्यायालयाने आरोपी पतीचा स्वतःच्या बचावासाठी केलेला दावा खोटा मानला.

शिवाय पत्नीच्या हत्येसाठी रमेश याने वापरलेल्या काठीवर लागलेले रक्ताचे डाग तसेच त्याच्या कपड्यांवर लागलेले रक्ताच्या डागाचे डीएनए चाचणीत ते सारख्या व्यक्तीचे असल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर नागपूर खंडपीठाने जिल्हा व सत्र न्यायालयाने रमेश जावळे याला दिलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post