नगर : पती कार्यालयात जाऊन पत्नीने जाऊन पतीला शिवीगाळ करत फाईली फेकून दिली. या प्रकरणी पतीच्या फिर्यादीवरून पत्नी विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील एका कार्यालयात ही घटना घडली. याप्रकरणी पतीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मी कार्यालयात नेहमी प्रमाणे कामकाज करत होतो. त्यावेळी माझी पत्नी कार्यालयात आली. मला माझ्या पगाराच्या स्लिप मागवू लागली.
यावेळी तिने आरडाओरड करून पगाराची स्लिप न दिल्यास स्वत: जिवाचे बरेवाईट करील विजयकुमार यांना म्हणाली, तु तुझ्या पगाराच्या स्लीपा मला दे, असे म्हणून आरडाओरडा करून विजयकुमार यांना शिवीगाळ केले.
जर पगाराच्या स्लीपा दिल्या नाही तर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करेल, अशी धमकी दिला. त्यानंतर माझ्या हातातील फाईल हिसकावून फेकून दिल्या. यावेळी एका महिलेला फोन लावून दिला. तो माध्याकजे दिला. त्यावेळी सदर महिलेने मला दूरध्वनीवरून शिवीगाळ केली. तसेच कार्यालयातील मिटिंगला जात असताना पत्नीने अटकाव केला.
याबाबत पतीने दिलेल्या फिर्यादीवरून पत्नीविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. पतीन पत्नीविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा हा पहिलाच गुन्हा असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Post a Comment