नगर : विनापरवाना बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकून सातजणांना ताब्यात घेऊन रोख रकमेसह जुगाराची साधने जप्त केली.
ही कारवाई नगर-दौंड रस्त्यावरील हॉटेल सुरज मागे इंदिरानगर येथील सूर्यभान बाबा गोरे यांच्या घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर केली.
या कारवाईत पोलिसांनी अनिल तुकाराम ठोसर (वय 43), कारभारी माधव गायमुखे (वय 65), एकनाथ हरिदास थोरे (वय 65), शहाजी दशरथ गायकवाड (वय 61), बाळासाहेब चंद्रभान गायकवाड (वय 46), संजय गुनाजी धीवर (वय 50), सूर्यभान बाबा गोरे (वय 65, सर्व रा. इंदिरानगर, हॉटेल सूरज हॉटेल पाठीमागे, नगर-दौंड रस्ता अहमदनगर) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पोलिस कॉन्स्टेबल अभय कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment