शिर्डी : गेल्या काही दिवसांपासून रखडलेली साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची आज निवड जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे व उपाध्यक्षपदी ॲड. जगदीश हरिश्चंद्र सावंत यांची निवड करण्यात.आली.
असलेल्या श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट (शिर्डी) चे विश्वस्त मंडळात आज गॅझेट काढून १२ जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. १६ सप्टेंबर २०२१ या तारखेपासून प्रभावीपणे अधिसूचना, "श्री साई बाबा संस्थान व्यवस्थापन समिती" वर या १२ व्यक्तींना तीन वर्षांच्या कालावधीसाठी सदस्य म्हणून नियुक्त केले आहे.
विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी आशुतोष अशोकराव काळे, उपाध्यक्षपदी ॲड. जगदीश हरिश्चंद्र सावंत, सदस्यपदी अनुराधा गोविंदराव आदिक, ॲड. सुहास जनार्दन आहेर, अविनाश आप्पासाहेब दंडवते, सचिन रंगराव गुजर, राहुल नारायण कानल, सुरेश गोरक्षनाथ वाबळे, जयवंतराव पुंडलिकराव जाधव, महेंद्र गणपतराव शेळके, एकनाथ भागचंद गोंदकर, शिर्डी नगर पंचायत अध्यक्ष आदींची निवड करण्यात आलेली आहे.
ही निवड प्रक्रिया रखडल्यामुळे सर्वांचेच याकडे लक्ष लागले होते. अध्यक्षपदी आमदार काळे यांची निवड होणार असल्याची चर्चा सुरु होती. तीच चर्चा तंतोतंत खरी ठरली आहे.

Post a Comment