अमर छत्तीसे
श्रीगोंदा : एटीएम कार्ड क्लोन करून लाखोंची रक्कम एटीएम मशिनव्दारे काढून फसवणूक करणार्या टोळीचा मुख्य आरोपी सायबर पोस्टे कडून मिरारोड (जि . ठाणे) येथून अटक करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांचे नेतृत्वाखाली पोसई प्रतिक कोळी, पोलिस हेडकॉन्स्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोलिस नाईक दिंगबर कारखेले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे, विशाल अमृते, अरुण सांगळे, गणेश पाटील, वासुदेव शेलार या सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने या गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषण करून गुन्हयाचे अनुषंगाने एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेवून त्याव्दारे आरोपींचा नगर - कल्याण रोडने पाठलाग करुन आरोपी धीरज अनिल मिश्रा, सुरज अनिल मिश्रा (रा. नायगाव यांना टोकावडे, ता. ठाणे) येथून ताब्यात घेण्यात आले होते.
अधिक माहिती अशी की, ११ मे २०२१ ला भिंगार पोलिस ठाण्यात दोन जणांचे एटीएम कार्ड क्लोन करून त्यांचे दुसरे एटीएम बनवून ते वेगवेगळया एटीएम मध्ये वापरून त्यामधून एक लाख 44 हजार काढल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
या तक्रारीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधि -२००० चे कलम ६६ ( C ) ( D ) सह ४२०,४०६,४६५ , ४६८ , ४७१,४७४,३४ या प्रमाणे गुन्हा ठाण्यात आला होता . या गुन्हाचा तपास करत असताना सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या नेतृत्वाखाली सायबर पोलिसांच्या पथकाने या गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्हयाचे अनुषंगाने एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.
त्याव्दारे आरोपींचा नगर कल्याण रोडने पाठलाग करुन आरोपी धीरज अनिल मिश्रा , सुरज अनिल मिश्रा ( रा नायगाव यांना टोकावडे ता ठाणे ) येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३१ बनावट एटीएम कार्डसह दोन लाख ६१ हजार ५०० हस्तगत करण्यात आले आहे.

Post a Comment