नगर : शेतीच्या वादातून सकाळी प्रात : विधीसाठी शेतात गेलेल्या वृद्ध वडिलांची त्याच्या दोघा मुलांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. ही घटना तालुक्यातील कारेगाव येथे घडली आहे.
याबाबत सुनिता उर्फ शालनबाई लक्ष्मण लोणारे (धंदा : शेती रा. कारेगाव ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले की 17 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता माझे पती लक्ष्मण दादा लोणारे ( वय 71) हे कारेगाव येथे आमच्या शेतात प्रातर्विधीसाठी गेले होते.
माझ्या सवतीची मुले भाऊसाहेब लक्ष्मण लोणारे व अशोक लक्ष्मण लोणारे दोन्ही (रा. रांजणगाव ता. नेवासा) यांनी जुन्या शेतीच्या वादातून धारदार हत्याराने माझ्या पतीच्या डोक्यात व हातावर वार करून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले. सुनिता लोणारे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment